
Samvad Lekhan In Marathi (संवाद लेखन मराठी)
संवादामुळे विचारांची देवाणघेवाण होते.
• पत्र, व्हाट्सअप, ई-मेल व भाषणही संवादाची साधने आहेत.
• संवाद बोलून अथवा लिहून दाखवला जातो.
(Important Points For Samvad Lekhan In Marathi)संवादलेखन करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी :
• संवादलेखन करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी :
• भिन्न दृष्टिकोन असल्यास रंगत वाढते.
• पात्रानुरूप भाषा असावी.
• संवादाचा विषय व भाषा विषयानुरूप असावी.
• वाक्ये फार मोठी असू नयेत.
• शेवट परिणामकारक असावा.
• संवाद कोठे घडला ? सुरुवात कशी झाली? व शेवट या गोष्टी स्पष्ट असाव्यात.
• संवाद बोलून अथवा लिहून दाखवला जातो.
संवाद लेखन कौशल्य (Important Points For Samvad Lekhan In Marathi)
१) प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा पैलू
२) उत्कृष्ट संवाद कौशल्यामुळे वेगळी ओळख निर्माण होते.
३) सुसंवादी असणे आवश्यक
४) विविध प्रकारची मतमतांतरे, त्यावरील चिंतन व विषयानुरूप सुसंगत असे संभाषण म्हणजे संवाद होय.
५) संवाद लेखन ही एक कला आहे.
संवाद लेखन मराठी के लिए आवश्यक स्वभाववैशिष्ट्ये (important na for samvad Lekhan In Marathi)
१) संवेदनशीलता
६) विश्वासार्हता
२) गुणग्राहकता
७) स्वागतशील वृत्ती
३) अनाग्राहीवृत्ती
४) विवेकशीलता
५) भावनिकता
(examples for samvad Lekhan In Marathi)संवादलेखनाचा नमूना:
ओल्या कचऱ्याचे निर्मूलन, याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद’ या विषयावर संवादलेखन करा. (भांडुप (प), मुंबई, ‘एस’ वार्ड मधील आरोग्य अधिकाऱ्यांशी ‘अरूणोदय सोसायटीची’ सदस्य या नात्याने सुरभी सावंत हिने साधलेला संवाद)
सुरभी: नमस्कार सर.
आरोग्य अधिकारी नमस्कार या, या बसा.
सुरभी : मी ‘अरुणोदय सोसायटी’ची सदस्य या नात्याने आपल्याकडे आले आहे.
आरोग्य अधिकारी : बरं. काय काम आहे तुमचे ?
सुरभी: सर, आम्हांला आमच्या सोसायटीत, ‘शून्य कचरा योजना’ राबवायची आहे. आम्ही ‘ओला कचरा’, ‘सुका कचरा’ यांचे वर्गीकरण करा असे ऐकले आहे. पण कसे ? नीट उमगले नाही. म्हणून तुमच्या भेटीला आले आहे.
आरोग्य अधिकारी : चांगली गोष्ट आहे. पण लक्षात घ्या आपण कोणतीही चांगली गोष्ट सुरू करतो; पण तिचा सतत पाठपुरावा करत नाही, म्हणून समस्या सुटत नाहीत.
सुरभी: आपण म्हणता ते अगदी खरं आहे; पण आम्ही सोसायटीच्या सर्वच सदस्यांनी निर्धार केला आहे. आम्हांला आपलं बहुमूल्य मार्गदर्शन हवं आहे.
आरोग्य अधिकारी : प्रथम आपण सोसायटीच्या सर्व सदस्यांची सभा घ्या. कचरा साठणं, कचरा कुजणं तो इतरत्र पसरणं याचे भीषण परिणाम लोकांना समजावून सांगा. परिसर अस्वच्छ बनतो, दुर्गंधी पसरते, रोगांच्या विविध साथी पसरतात, गंभीर आजार होतात, उंदीर, घुशी, भटकी कुत्री यांचा सुळसुळाट होतो, परिसर बकाल होतो आणि याचा फटका लहान मुले, वयोवृद्ध माणसांना प्रथम बसतो. हे सगळं नीट समजावून सांगा.
सुरभी : होय सर. नक्की, नक्कीच आम्ही हे सारं सांगू.
आरोग्य अधिकारी : आता, पुढील टप्पा घरात कचऱ्याची ‘ओला कचरा’ व ‘सुका कचरा’ अशी विभागणी करायची. लोकांना तशी सवय लावायची. ही घ्या यादी यात ‘ओला कचरा’ कोणता ? व ‘सुका कचरा’ कोणता ? ते दिले आहे. तुम्ही तुमच्या सोसायटीच्या आवारात एक खड्डा तयार करा व ‘ओला कचरा’ त्या खड्ड्यात साठवा. सुंदर कंपोस्ट खत तयार होईल व ‘सुका कचरा’ भंगारवाल्यांना दया. म्हणजे पहा शून्य कचरा, शून्य खर्च! वरून भंगारातील वस्तूंचे पैसे व कंपोस्ट खताचे पैसे तुम्हांला मिळतील. पालिकेचाही वेळ, श्रम व पैसे वाचतील.
सुरभी : खत मिळणार असेल तर आम्ही आमच्या सोसायटीचा परिसर रोपरोपट्यांनी सुशोभित करू व भंगारातून मिळालेल्या पैशांतून सुंदर रोपे खरेदी करू व त्यांची देखभाल करू. खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!